Petrol-Diesel Price Today 2nd September:  आज (2 सप्टेंबर) सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासादायक ठरला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे  महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील तेलाच्या किमतीत तीन महिन्यांपूर्वी बदल करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्चे तेलाचे नवीनतम दर
मेघालयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले. पुन्हा एकदा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $90 च्या खाली गेली आहे. शुक्रवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $87.31 वर पोहोचली. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 93.01 वर घसरल्याचे दिसून आले.  यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर


- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर 
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04  रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


पेट्रोल आणि डिझेलचे दर असे तपासा


पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर तपासण्यासाठी तेल कंपन्या SMS द्वारे दर तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करा.