Petrol-Diesel price Today: सरकारी तेल कंपन्यांनी  आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 91.17 रुपये प्रति लीटर तर डीझेलची किंमत (Diesel Prices) 81.47 रुपये प्रति लीटर एवढी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. 


मुंबईत पेट्रोलची किंमत 97.57 रुपये प्रतिलीटर आहे. तर डीझेलची किंमत 88.60 रुपये  प्रतिलीटर इतकी आहे. सध्या पेट्रोलच्या किंमतीं स्थिर असल्या तरी मुंबईत पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


पेट्रोल-डिझेलच्या किंमती रोज सकाळी 6 वाजता ठरतात.  यामध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन अन्य कर जोडल्यानंतर त्यांच्या किंमती दुप्पट होतात.  आंतरराष्ट्रीय बाजार आणि परदेशी चलनाच्या  बदलत्या दरांनुसार पेट्रोल - डिझेलच्या किंमती ठरत असतात