Petrol Diesel Price on 21 March 2023 : आज पहाटेपासूनच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच सकाळीच कामावर निघणाऱ्या नोकरदार, वृत्तपत्र ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडवली आहे. जर तुम्हीपण घाईत घराच्या बाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $73 च्या आसपास आहे. तर आज सरकारी कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज यूपीच्या अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाच्या किमती अजूनही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. 


वाचा : मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, उपनगरात काय परिस्थिती?


सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गाझियाबादमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग झाले आहे आणि ते 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 15 पैशांनी महागले आणि 96.57 रुपये प्रति लीटर विकले गेले. तर डिझेल 14 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पेट्रोल 49 पैशांनी घसरून 96.89 रुपये प्रति लीटर झाले आहे. पण डिझेल 19 पैशांनी स्वस्त होऊन 90.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासांत त्याच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड अजूनही 73.36 डॉलर प्रति बॅरलवर चालू आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $67.29 आहे.


चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर


- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


या शहरांमध्ये दर बदलले


- गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गुरुग्राममध्ये पेट्रोल 96.89 रुपये आणि डिझेल 90.24 रुपये प्रति लिटर झाले आहे.


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.