Petrol & Diesel Price Today: फेब्रुवारी महिन्यात इंधनाच्या (Fuel Price) दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातून ही वाढ आणि मागणी गेल्या 27 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक होती. मार्च महिन्याापासून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये थोडी सवलत मिळत असून गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलच्या (Petrol and Diesel Rates) दरात घट दिसून येते आहे. कालही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ नव्हती आणि आजही त्यांच्या किंमतीमध्ये वाढ नसल्याचे दिसून आले आहे. आजचे दर हे स्थिरस्थावर (Petrol and Diesel Price Unchanged) असून पेट्रोलची किंमत ही 106.31 रूपये प्रति लीटर आहे तर डिझेलची किंमत ही 94.27 रूपये एवढीच आहे. त्यामुळे कालच्याप्रमाणे आजही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नसून ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Petrol Diesel Price today remains unchanged buyers get the good news today see the price chart in 7 days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील (Mumbai Fuel Price) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या बदलल्या नसून त्या आहेत तशाच आहेत. दिल्लीच्या भागातही ही किमत बदलली नाही. कोलकाता येथे ही पेट्रोलची किंमत 106.03 रूपये प्रति लीटर आणि डिझेल 92.76 रूपये आहे तर चेन्नई येथे पेट्रोलची किंमत ही 102.63 रूपये आहे तर डिझेलची किंमत ही 94.24 रूपये इतकी आहे आणि बंगलोर येथे ही किंमत 101.94 रूपये असून डिझेलची किंमत ही 87.89 इतकी आहे. 


गेल्या सात दिवसात कसे आहेत दर? (Petrol and Diesel Rates in Last 7 Days)


गेल्या 11 मार्चपासून ते 17 मार्चपासून तुम्ही पाहिलंत तर मुंबईत पेट्रोलच्या किमती या वाढलेल्या नाहीत. त्याचबरोबर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीमध्येही फारशी तफावत नव्हती. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात तेलाचे आणि इंधनाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. त्यापैंकी काही भागात हे दर घटलेही आहेत. 


किती वॅट आकारला जातो? (VAT On Petrol and Diesel Price)


पेट्रोलवर 5 रूपये प्रति लिटर तर डिझेलवर 3 रूपये प्रति लिटर वॅट आकारला जातो. त्यानुसार ग्राहकांना अधिकीचे पैसे मोजावे लागतात. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या जास्त वाढलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.