सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. शनिवारी पेट्रोल ११ पैसे आणि डिझेल १० पैस प्रती लीटर महागलंय. शनिवारी पेट्रोलमध्ये ५ पैसे तर डिझेलमध्ये ६ पैशांची वाढ दिसून आली होती. दोन दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी (आज) या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं.
शनिवारी मुंबईत पेट्रोल ७५.९७ रुपये तर डीझेल ६७.२२ रुपये प्रती लीटरवर पोहचलेलं पाहायला मिळतंय.
तर दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७०.२८ रुपये आणि डिझेलची किंमत ६४.११ रुपये आहे.
कोलकातमध्ये पेट्रोल ७२.५४ रुपये तर डिझेल ६६.०३ रुपये, चेन्नईत पेट्रोल ७३.०१ रुपये तर डिझेल ६७.८१ रुपये, नोएडामध्ये पेट्रोल ७०.२१ रुपये आणि डिझेल ६३.५६ रुपये प्रति लीटरवर आहे.
येणाऱ्या काही दिवसांत पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोलियमलाही जीएसटी अंतर्गत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे इराण आणि अमेरिके दरम्यान तणाव निवळल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव स्थिर झालेले दिसत आहेत. हळूहळू त्यामध्येही कपात होण्याची शक्यता आहे.