नवी दिल्ली : Petrol Price Today: वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती.


बेंचमार्क ब्रेंट क्रूड (Brent crude) 6.95 टक्क्यांनी घसरून 78.89 डॉलर प्रति बॅरल झाले आहे, जे 10 दिवसांपूर्वी 84.78 डॉलर प्रति बॅरल होते.


जगात काही देशांमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये घट होत आहे. 


मागील वर्षी कोरोना संसर्ग वाढला असताना इंधनाच्या किमतीत घट नोंदवली गेली होती. कोरोना संसर्ग वाढू लागल्यास पेट्रोल-डिझेल तसतशी मागणी कमी होत आहे. सध्या सामान्य जनतेला पेट्रोल - डिझेलच्या दरांमध्ये घट होईल अशी अपेक्षा आहे.


देशातील 4 शहरातील आजचे दर जाणून घ्या...
शहर पेट्रोल/प्रति लीटर डिझेल/ प्रति लीटर
दिल्ली 103.97           86.67
मुंबई 109.98             94.14
चेन्नई 101.40             91.43
कोलकाता 104.67      89.79


4 नोव्हेंबरपासून इंधनाच्या किमती स्थिर
भारतातील ऑटोमोटिव्ह इंधनाच्या किरकोळ किमती 4 नोव्हेंबरपासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 आणि 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर देशातील मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.