Petrol Diesel Price on 27 March 2023 : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (27 मार्च 2023) सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती जाहीर केल्या. जागतिक बाजारात क्रूडने प्रति बॅरल 75 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्येही (Petrol Diesel Price Today) वाढ दिसून आली. आज पटनामध्ये पेट्रोलच्या दराने 108 रुपये प्रतिलिटरचा टप्पा पार केला आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाचे दर स्थिर राहिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76  106.03
चेन्नई 94.24 102.63 

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी महाग झाले असून ते 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. बिहारची राजधानी पाटणामध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी महागले असून ते 108.12 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. डिझेलही 30 पैशांनी वाढले असून 94.86 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्येही आज पेट्रोल 4 पैशांनी महाग झाले असून ते 96.93 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 4 पैशांनी महागून 89.80 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. 


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.