मुंबई : इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑईल स्वस्त झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट पाहायला मिळत आहे. मात्र तेलाची किंमत वाढल्यामुळे झालेल्या पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीसमोर ही कपात अगदीच कमी आङे. 29 मे पासून सुरू झालेला हा प्रवास 15 जूनपर्यंत सुरूच आहे. या अगोदर 14 व्या दिवशी म्हणजे 12 जून रोजी पेट्रोलच्या किंमतीत 15 पैसे आणि डिझेलच्या दरात 10 पैसे कपात केली आहे. यानंतर 13 आणि 14 जून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात 8 पैसे प्रति लीटर कमी केले आहे. 


पेट्रोल 2.08 रुपयांनी स्वस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक निवडणुकीनंतर 17 दिवसांनी पेट्रोल 2.08 रुपये आणि डिझेल 1 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली असून 76 रुपये 35 पैशांवर आली आहे. तर डिझेल 67 रुपये 85 पैसे प्रति लीटर झालं आहे. शुक्रवारी पेट्रोलचे दर 84.18 रुपये प्रति लीटर तर डिझेल 72.24 रुपये प्रति लीटर आहे. चैन्नईत पेट्रोलचा दर 79.24 रुपये प्रति लीटर असून कोलकातामध्ये 79.02 प्रति लीटर आहे. 


मुंबईमध्ये डीझेलचा रेट 74.24 रुपये 


मुंबईत शुक्रवारी डिझेलचा दर 74.24 रुपये प्रति लीटर होता. कोलकातामध्ये 74.40 प्रति लीटर होता. तर चैन्नईत 71.62 अशी डिझेलच्या दराची नोंद झाली आहे. गेल्या 17 दिवसांत 9 जून रोजी तेल कंपनीकडून पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली. तेव्हा डिझेल 32 पैसे आणि पेट्रोल 42 पैशांनी कमी झालं आहे.