मुंबई : पेट्रोल, डिझेल (petrol, diesel) स्वस्त होण्याची शक्यता आहे. इंधनाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत. पीएमओने इंधनाच्या वाढत्या दरावर बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत पेट्रोल, डिझेल स्वस्त (petrol, diesel prices) करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार अबकारी कर कमी करण्याबाबत निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याचे संकेत मिळाले आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने दर नियंत्रणात आणण्यालाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्यादृष्टीनं पंतप्रधान कार्यालयाने तातडीची बैठक घेतली असून यात अबकारी कर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.