मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने राष्ट्रीय बाजारातील किंमतीवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. ३६ दिवस सातत्याने कमी होणाऱ्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत १७ पैसे तर डिझेलच्या किंमतीत १३ पैशांनी वाढ झाली. शुक्रवारी पेट्रोलच्या किंमतीत १४ तर डिझेलच्या किंमतीत १६-१८ पैशांनी वाढ झाली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 75.85 रुपये प्रति लीटर झाली आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल 83.24 रुपये, कोलकत्तात 78.53 रुपये आणि चेन्नईत 78.72 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांनुसार, सातत्याने वाढणाऱ्या किंमतीचा हा परिणाम आहे. तेल कंपन्यांच्या मार्जिनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने किंमतीत वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांत आलेल्या घटीमुळे तेल कंपन्यांना खूप नुकसान होत आहे. 


चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती


शहर          किंमत (प्रति लीटर)
-दिल्ली        75.85 रुपये
-मुंबई         83.24 रुपये
-कोलकाता      78.53 रुपये
-चेन्नई        78.72 रुपये


चार महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती


शहर          दाम (प्रति लीटर)
-दिल्ली        67.66 रुपये
-मुंबई         71.79 रुपये
-कोलकाता      70.05 रुपये
-चेन्नई        71.42 रुपये


दिल्लीत डिझेल 67.66 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. तर मुंबईत 71.79 रुपये, कोलकत्तात 70.05 रुपये आणि चेन्नईत 71.42 रुपये या दराने मिळत आहे. 


म्हणून वाढत आहेत किंमती


इराणवर लागलेल्या अमेरिकी प्रतिबंधामुळे ट्रेडर्सला बाजारात ऑईलचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच तेलांच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. सध्या ब्रेंट क्रूड 77.69 डॉलर प्रति बॅरल आहे. अलिकडेच ओपेक देशात 10 लाख बॅरलहून अधिक तेलाचा पुरवठा करण्याचे जाहीर केले होते. पण तेलाची ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.