Petrol Diesel Rate on 11 August 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती भडकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.17 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 86.55 डॉलरवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडचा दर 0.21 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 82.99 डॉलर झाला आहे. दरम्यान, देशातही तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) नवे दर जारी केले आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 ऑगस्ट 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. त्यानंतर पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. काही शहरांमध्ये किमती कमी झाल्या आहेत तर काहींमध्ये वाढल्या आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आज त्यात वाढ नोंदवली गेली आहे.


मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर काय?


देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तितकासा बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


जगभरात काय आहेत पेट्रोलचे दर?


भारतात, जिथे पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे, जगात असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोल खूप स्वस्त मिळते. व्हेनेझुएलासह असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोलचे दर खूपच कमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल दक्षिण अमेरिका खंडात असलेल्या व्हेनेझुएलामध्ये उपलब्ध आहे. व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल दोन रुपयांपेक्षा कमी दराने उपलब्ध आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत केवळ 1.50 रुपये आहे. इराण हा प्रमुख कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 4.50 रुपये आहे. इराण भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाची निर्यात करतो. याशिवाय दक्षिण-पश्चिम आफ्रिकेतील अंगोला हा देश तेल आणि सोन्याच्या खाणींसाठी जगभर प्रसिद्ध आहे. अंगोलामध्ये 17.82 प्रति लिटर पेट्रोल विकलं जात आहे.