Petrol Diesel Rate on 20 August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत.मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. देशातील तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजत पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइलने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 81.25 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84.80 डॉलरवर विकले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल डिझेलच्या किमती जाहीर केल्या जातात. राष्ट्रीय बाजारात बऱ्याच काळापासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे विविध राज्यांतील शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडासा बदल दिसून येतो. त्याचबरोबर देशातील विविध राज्यांतील निवडणुकांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


20 ऑगस्ट 2023 रोजी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.


दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी जनतेला महागाईपासून काहीसा दिलासा मिळू शकतो, अशी चर्चाही जोर धरू लागली आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी महागड्या पेट्रोल-डिझेलपासून दिलासा मिळेल, अशी आशा लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. दुसरीकडे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सरकार निवडणुकीपूर्वी तेल आणि वायूच्या किमती कमी करेल किंवा कमी करेल हा चुकीचा समज आहे.