वाहनधारकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?
Petrol Diesel Price today 10th December 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटनुसार iocl.com पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे घरी बसून तुमच्या शहरातील पेट्रोलची किंमत तपासू शकता.
Today Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी आजही (10 डिसेंबर 2022) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिल्ली, मुंबई (mumbai petrol rate), कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, राष्ट्रीय बाजारपेठेतील पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel rate) जैसे थेच आहेत.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी
21 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.
शहराचे नाव पेट्रोल रु/लिट डिझेल रु/लि
दिल्ली 96.72 89.62
मुंबई 106.31 94.27
कोलकाता 106.03 92.76
चेन्नई 102.63 94.24
वाचा: India vs Australia महिला ट्वेन्टी-20 मालिका आजपासून सुरूवात होणार, कोण करणार विजयी सुरुवात?
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. मात्र, अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत.
शहराचे नाव पेट्रोल रु.लिट डिझेल रु.लिटर
अजमेर - 108.43 - 93.67
श्रीगंगानगर - 113.65 - 98.39
पाटणा - 107.24 - 94.02
नोएडा - 96.57 - 89.96
चंदीगड - 96.20 - 84.26
गुरुग्राम - 97.18 - 90.05
घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर
तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.