Petrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा एका क्लिकवर
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Petrol Diesel Rate Today 7 October 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या बदलामुळे जनतेच्या खिशाला मोठा फटका बसताना दिसत आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel rate) दर स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलात बरीच अस्थिरता आली असली तरी देशातील पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तसेच डिझेलच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. (petrol diesel rate today 7 october 2022 in maharashtra marathi news)
भारतीय तेल कंपन्यांनी आजचे (7 ऑक्टोबर) पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर (Crude Oil Production) जारी केले आहेत. मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi), कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्वच शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर (Fuel Price) स्थिर आहेत.
सरकारी कंपन्यांद्वारे जारी करण्यात आलेल्या नव्या किमतींनुसार देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत (mumbai petrol rate) पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर झाला आहे.
तसेच, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
चेन्नई | 102.74 रुपये | 94.33 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
तुमच्या मोबाईलवरही पाहता येणार इंधन दर
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price) मोबाइलवरही इंधन दर पाहता येतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.