पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, मुंबईने गाठला उच्चांक
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी इंधनात वाढ
मुंबई : पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे दर आजही प्रत्येकी ३५ पैशांनी वाढले. देशात पेट्रोल डिझेल विक्रमी महाग किंमतीत विकलं जातं आहे. मुंबईत पेट्रोल ११५ रूपये ५० पैसे तर डिझेल 106 रूपये 62 पैशांनी विकलं जातं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर ९० डॉलर प्रती बॅरल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशात हे कडाडलेले तर कमी होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. केंद्र सरकारने आता तरी यात हस्तक्षेप करून या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी होती.
पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दररोज वाढ होत आहे. आज देखील 36 पैशाने पेट्रोल तर डिझेलमध्ये 39 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडला आहे.
शहर | पेट्रोल | डिझेल |
दिल्ली | 109.69 | 98.42 |
मुंबई | 115.50 | 106.62 |
चेन्नई | 110.15 | 101.56 |
कोलकाता | 106.35 | 102.59 |
रोज सकाळी ठरतात इंधनाचे दर
दररोज सकाळी इंधनाचे दर बदलतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात. तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारतात.