नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. याच्या दुसऱ्या दिवशीच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका पाहायला मिळाला. शनिवारी दिल्लमीध्ये पेट्रोलच्या किंमतीत 2.45 प्रति लीटरने वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 72.96 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोलच्या किंमती सोबत डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलच्या किंमतीत 2.36 रुपये प्रति लीटरची वाढ झाली असून त्याचे दर 66.69 रुपये प्रति लीटर झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईत आज पेट्रोल 78.57 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. तर डिझेल 69.90   रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. मोदी सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस आणि एक्साइज ड्यूटी वाढवण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर सरकारतर्फे 1 रुपया प्रति लीटर प्रमाणे सेस लावण्यात आला आहे. तसेच पेट्रोल 1 रुपया प्रति लीटर हिशोबाने एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे.