नवी दिल्ली : पेट्रोलची दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज बदलत असले तरी आज अचानक तब्बल दोन रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत याच महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल आठ रुपयांनी पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. 


किती झाले आता पेट्रोलचे भाव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागलीय. मुंबईतर तर आज पेट्रोलच्या दरानं 80 रुपयांचा टप्पाही पार केलाय. त्यामुळं वाहनधारकांना जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या पाच वर्षांतला हा सर्वोच्च दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम देशातल्या पेट्रोलच्या दरांवर झालाय. 


तेलाच्या दरात मोठी वाढ


युरोपमध्ये थंडी वाढल्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. त्यामुळं कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. पेट्रोलच्या या मोठ्या दरवाढीमुळे आता पुन्हा एकदा एक्साईज ड्युटीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. एक्साईज ड्युटी कमी करण्याची मागणी पेट्रोलपंप चालकांनी केलीय.