मोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ
पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल ५ वर्षांत प्रथमच मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल ५ वर्षांत प्रथमच मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलची किंमत ७४ रुपये ८ पैसे प्रति लीटर होती. सप्टेंबर २०१३ नंतर ही सर्वात मोठी वाढ आहे. डिझेलची किमत दिल्लीत ६५ रुपये ३१ पैसे प्रति लीटर झालेय. याआधी कधीही डिझेल इतके महाग झालेले नव्हते. मुंबईमध्ये पेट्रोल ८१ रुपये ९३ पैसे झाले आहे.
कच्चा तेलाच्या किमतीत वाढ
पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात वाढती किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमत वाढीमुळे झालेय. कच्चा तेलाचा दर हा प्रत्येक दिवशी बदलत असतो. कच्चा तेलाची किंमत जशी जशी बदलत आहे, त्याप्रमाणात पेट्रोल आणि डिझेल महाग होत आहे. २०१४ नंतर कच्चा तेलाच्या किंमती या सर्वाधिक राहिल्या आहेत. क्रुडे तेला ७३.७८ डॉलर प्रती बॅरलवर गेलाय. तसेच अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराण देशावर निर्बंध लादण्याची शक्यता आहे. सीरियात वाढता संघर्ष पाहता कच्चा तेलाची पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होईल.
पेट्रोल ४, डिझेल ६ रुपये महाग
एप्रिल महिन्याच्या सुरुवातील पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली. ५० पैशांनी पेट्रोल महाग झालेत तर डिझेल ९० पैशांनी महाग झाले. या वर्षाच्या सुरुवातील ४ महिन्यात पेट्रोलची किंमत ४ रुपयांनी वाढली. डिझेलच्या किमतीत ५-६ रुपयांनी वाढले. हे कोणत्याही वर्षात एतकी वाढ झालेली नाही. जागतिक कच्चा तेल किमतीचा प्रभाव हा केंद्र आणि राज्य सरकारच्या करामुळे वेगवेगळा दिसून येत आहे. दरम्यान, सरकार जीएसटीमुळे पेट्रोल-डिझेल आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पुन्हा दर वाढीचे संकट आहे.