मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना आता आणखीन एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोलच्या किंमतीने गेल्या ४.५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सर्वात महाग डिझेल चेन्नईत आहे. चेन्नईत डिझेलच्या किंमतीने सत्तरी ओलांडली आहे. दिल्लीसोबतच इतर शहरांतही डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे.


कच्च्या तेलामुळे वाढल्या किमती


आंतरराष्ट्रीय बाजारात इंडियन बास्केटमध्ये क्रूडच्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती सलग वाढत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मोदी सरकार एक्साईज ड्युटी कमी करुन ग्राहकांना दिलासा देण्यासाचा प्रयत्न करत आहे. इंडियन बास्केटमध्ये कच्च्या तेलाचे दर गेल्या महिन्यात साधारण ७३ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे.


५८ टक्क्यांनी महागलं कच्चं तेल


इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, सोमवारी दिल्लीत पेट्रोलच्या किमती ७३.९९ रुपये प्रति लिटर आहेत. मुंबईत ८१.८४ रुपये प्रति लिटर आहे. याच प्रमाणे दिल्लीत डिझेलची किंमत ६४.९३ रुपये प्रति लिटर आहे तर, मुंबईत ६९.१४ रुपये प्रति लिटर आहे. जून २०१७ नंतर कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. इकोनॉमी सर्व्हेनुसार, FY-19 मध्ये हा दर १२ टक्के आणखीन महाग होऊ शकतो. तर, भारतीय बास्केटमध्ये कच्चं तेल १० महिन्यांत ५८ टक्क्यांनी महागलं आहे. 


शहर पेट्रोल डिझेल


दिल्ली ७३.९९ / लिटर ६४.९३ / लिटर


मुंबई ८१.८४ / लिटर ६९.१४ / लिटर


कोलकाता     ७६.७० / लिटर            ६७.६२ / लिटर


चेन्नई ७७.९४ / लिटर ७०.४५ / लिटर