Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel rate) दर स्थिर आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. सध्या दोन राज्यांच्या निवडणुका आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातील एका राज्यातील निवडणुकीचा बिगूल वाजलेला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्चा तेलाचे (Crude Oil) दर सातत्याने कमी-अधिक होत आहे. पण ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर भाव वाढीची शक्यता आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


कच्च्या तेलाचे नवीनतम दर


कच्च्या तेलाची विक्रमी पातळी घसरल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यात वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा त्यात नरमाई आली आहे. बुधवारी ( 19 ऑक्टोबर ) सकाळी WTI क्रूड $ 83.89 आणि ब्रेंट क्रूड $ 90.86 प्रति बॅरलवर दिसले. दरात नरमाई येऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही दिलासा नाही. गेल्या साडेचार महिन्यांपासून दर जुन्याच पातळीवर आहेत.


देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) दरात शेवटचा बदल 22 मे 2022 रोजी दिसून आला. त्यावेळी केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करून महागड्या तेलापासून दिलासा दिला होता. सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशभरात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना अधिक दिलासा दिला होता.


शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 19th october)


- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर


वाचा : Aadhar Card संदर्भात मोठी बातमी; हे काम आताच करून घ्या, नाहीतर...


तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि तुमचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून दर जाणून घेऊ शकतात.


तर HPCL ग्राहक HP Price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवल्यानंतर त्यांना ताजे दर एसएमएसद्वारे मिळतील. सकाळी 6 वाजेनंतर एसएमएस (sms) केल्यास तुम्हाला ताजे दर समजतील.