Aadhar Card संदर्भात मोठी बातमी; हे काम आताच करून घ्या, नाहीतर...

Aadhar Card link : UIDAI कडून एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. 

Updated: Oct 18, 2022, 03:49 PM IST
Aadhar Card संदर्भात मोठी बातमी; हे काम आताच करून घ्या, नाहीतर... title=

Aadhar card update : आजकाल प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड (aadhar card update) आवश्यक झाले आहे. तर काही लोकांच्या कार्डमध्ये जन्मतारीख, लिंग आणि नाव किंवा आडनाव अपडेट केलेलं नाही. परिणामी अशा लोकांना सरकारी योजनांचा लाभ घेता अनेक अडचणींना सामोरे जाव लागत. सरकारी योजनेशिवाय आजकाल खासगी क्षेत्रातही तितकीच गरज आहे. आजकाल सायबर फसवणूक करणारेही कमी नाहीत. आधार कार्डच्या माध्यमातून लोकांची अनेक प्रकारची फसवणूक होत आहे. त्यामुळे UIDAI ने नागरिकांना सावध करत ट्विटद्वारे ई-मेल लिंक करण्यास सांगितले आहे.

UIDAI ने केले ट्विट 

UIDAI ने 17 ऑक्टोबर रोजीच ट्विट केले होते की, आधार कार्ड त्याच्या ई-मेल आयडीशी लिंक केल्यास खूप फायदा होईल. तुम्ही कुठेही आधार कार्ड वापरल, त्याच वेळी तुम्हाला तुमच्या ई-मेलवर अलर्ट पाठवला जाईल. म्हणजेच, जेव्हा कोणी तुमचे आधार चुकीचे प्रमाणीकरण करेल  त्याच वेळी तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीद्वारे संदेश पाठवला जाईल. ज्याच्या सहाय्याने कधी कोणी फसवणूक केली तर कळेल. 

वाचा : दिवाळी मध्ये भेटवस्तू काय देऊ हा प्रश्न पडत असेल तर पाहा लिस्ट  

आधार लिंकिंगचे फायदे

जर तुम्ही तुमच्या मेल आयडीने आधार अपडेट केलात तर तुमचा आधार कोणत्याही अनावश्यक कामासाठी तर वापरला जात नाही ना हे तुम्ही सहज शोधू शकाल. याशिवाय, जिथे जिथे तुमचा आधार वापरला जाईल तिथे तुम्हाला त्याचा अलर्ट मिळेल. आजकाल अनेक सायबर घोटाळेबाज लोकांकडून OTP घेऊन आर्थिक फसवणूक करत आहेत. याशिवाय गुन्ह्यातही आधारचा वापर केला जात आहे.

याप्रमाणे आधार लिंक करा

UIDAI ने सांगितले की, जर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आधार कार्डमध्ये अपडेट करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. तुमच्या जवळच्या आधार केंद्राबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही या वेबसाइटला भेट देऊ शकता. https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/