Petrol Diesel Price on 17 May 2023 : देशभरात अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price ) कोणताही बदल झालेला नाही. मात्र लवकरच ही परिस्थिती बदलू शकते. याचे कारण म्हणजे तेल कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोलवर 10 रुपये नफा होत आहे. मात्र असे असले तरी सध्या ते पूर्वीचे नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी पेट्रोलचे किरकोळ दर कमी झालेले नाहीत. मात्र तरीही विकल्या जाणाऱ्या डिझेलचा प्रतिलिटर साडेसहा रुपये खर्च कंपन्यांना सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बदल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असताना ही, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price ) किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात क्रूड सध्या $75 च्या आसपास आहे. त्यानुसार आज दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आजही स्थिर आहेत. गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर नोएडा-गाझियाबादसह एनसीआरच्या अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत.


वाचा: मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण


तर अन्य शहरांमध्ये म्हणजेच गौतम बुद्ध नगर पेट्रोल 24 पैशांनी वाढून 97 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 21 पैशांनी वाढून 90.14 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महागले आणि ते 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. यूपीची राजधानी लखनऊमध्येही पेट्रोल 5 पैशांनी महागले असून ते 96.62 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय डिझेलही 5 पैशांनी महागून 89.81 रुपये प्रति लिटर झाले आहे. 


मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


दररोज सकाळी 6 वाजता बदलतात दर...


कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जारी करतात. तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत सहज जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्हाला RSP डीलर कोड 92249 92249 वर एसएमएस करावा लागेल. यानंतर तुम्हाला घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे आज दर समजतील.