मुंबई : पेट्रोलचे दर मंगळवारी सलग पाचव्या दिवशी घसरले आहेत. मात्र, डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नाही. एक दिवस अगोदर तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात अतिशय कमी कपात केली होती. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलच्या दरात पाच पैशांनी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची दरात खूप कपात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर क्रमश: 72.60 रुपये, 75.32 रुपये,78.28 रुपये आणि 74.45 रुपये प्रती लीटर असणार आहे. चारही महानगरात डिझेलच्या दरात क्रमश: 65.76 रुपये, 68.16 रुपये, 68.96 रुपये आणि 69.50 रुपये प्रती लीटर आहे. 


महिन्याच्या सुरूवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाले. आता दुसऱ्या आठवड्यातही पेट्रोलच्या दरात कपात झाली असून डिझेलच्या दरात स्थिरता मिळाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 6 पैसे आणि डिझेलच्या दरात 5 पैशांनी कपात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदल पाहायला मिळाला. 


दिवाळीनंतर पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत घसरण होताना दिसतेय. यापूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं होतं. मंगळवारी सकाळी पेट्रोलच्या दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १० पैसे प्रति लीटर घट झाली.  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नजिकच्या भविष्यातही कच्च्या तेलाच्या किंमतीत स्थिरता दिसून येईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत १.५० रुपये प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत १.२५ रुपये प्रती लीटर घट झाल्याचं दिसून येत आहे.