नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारातील इंधनाच्या किंमतीवरही होत आहे. चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग वाढ होताना दिसत आहेत. मागील चार दिवसांपासून पेट्रोल ४१ पैसे प्रती लिटर तर डिझेल ५० रूपये प्रती लिटर महाग झाले आहे. दिल्ली मध्ये आज पेट्रोलचे दर १३ पैसे प्रती लिटर तर डिझेल १४ रूपये प्रती लिटर आहे. एक लिटर पेट्रोलचे दर ७२.०७ तर डिझेल ६७.४१ रूपये प्रती लिटर झाले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मध्ये आज पेट्रोलचे दर १३ पैसे प्रती लिटर तर डिझेल १५ रूपये प्रती लिटर आहे. एक लिटर पेट्रोलचे दर ७७.७० तर डिझेल ७०.६२ रूपये प्रती लिटर झाले आहे. कोलकत्ता मध्ये पेट्रोलचे दर १३ पैसे प्रती लिटर तर डिझेल १४ रूपये प्रती लिटर आहे. एक लिटर पेट्रोलचे दर ७४.१६ तर डिझेल ६९.२० रूपये प्रती लिटर महाग झाले आहे.    


'ओपेक' देशांकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून परिणामी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.