पेट्रोलच्या किंमती स्थिर, डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत.
मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती या सामन्य नागरिकांना हैराण करणाऱ्या असतात. कच्चा तेलाच्या दरात झालेल्या वृद्धीनंतर याचा परिणाम पेट्रोल डिझेल च्या किंमतीवर होतो. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत रुपयाची किंमत, तेल उत्पादन होणाऱ्या देशांच्या बदलत्या भूमिका या सगळ्याचा थेट परिणाम इंधन दर वाढीवर होतो. सामान्य नागरिकांना आपला खिसा प्रत्येक वेळी रिकामी करावा लागतो. दूध, भाजीपाला अशा सर्वांच्या किंमतीत वाढ होऊन महागाईत आणखी भर पडते. पण आज डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असली तरी पेट्रोलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत.
मुंबईतले दर
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग होणाऱ्या कपातीला ब्रेक लागला होता. त्यानंतर आज पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. डिझेलच्या किंमतीत 9 पैशांची कपात पाहायला मिळाली.
दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोलची किंमत 70.29 रुपये प्रति लीटर तर डिझेल 64.57 रुपये प्रति लीटर आहे.
दुसरीकडे मुंबईत पेट्रोलचे दर 75.91 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 67.57 रुपये प्रति लीटर आहेत.
रुपया मजबूत
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ही मोठी घसरण पाहायला मिळतेय. जगामध्ये डब्ल्यूटीआय क्रूड आणि ब्रेंट क्रूड हे दोन प्रकारचे क्रूड उत्पादन होतं याबद्दल तुम्हाला माहिती असेल. पुढचे काही दिवस निर्णायक ठरतील. रुपया सध्या मजबूत होताना दिसतोय. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ७० च्या स्तरावर आहे.
हे वर्ष संपेपर्यंत भारतीय रुपया आणखी मजबूत झालेला दिसेल. '2018 पर्यंत रुपयावर दबाव वाढला होता पण डिसेंबर पर्यंत भारतीय करंसी दोन ते तीन टक्क्यांनी मजबूत होऊ शकते', असं स्टैंडर्ड चार्टर्डमध्ये साउथ एशियाचे फॉरन एक्सचेंज, रेट्स आणि क्रेडिट हेड गोपीकृष्णन एमएस सांगतात.