मुंबई : तेल कंपन्यानी पेट्रोलचे (Petrol) दर स्थिर ठेवून डिझेलचे (Diesel) दर वाढविले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात डिझेलचे दर नऊ वेळा वाढविले आहेत. दिल्लीत डिझेलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. सातत्याने होणाऱ्या किंमत वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फळं आणि भाज्यांमधील इतर खाद्यपदार्थ महाग होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल कंपन्यांनी जुलै महिन्यात केवळ डिझेलचे दर वाढवले ​​आहेत. डिझेलच्या दरात १.४५ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्याच्या किंमतीत अखेरची वाढ २९ जून रोजी झाली होती, तीदेखील प्रतिलिटर फक्त ५ पैसे.


दिल्लीसह इतर शहरांची स्थिती


दिल्लीत पेट्रोलची किंमत ८०.४३ रुपये असताना डिझेल ८१.७९  रुपयांवर गेले. दिल्ली हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.


शहराचे नाव पेट्रोल रुपये /लीटर डिझेल रुपये /लीटर
दिल्ली 80.43 81.79
मुंबई 87.19 79.97
चेन्नई 83.63 78.73
कोलकाता 82.10 76.91
नोएडा 81.08 73.70
रांची 80.29 77.64
बंगळुरु 83.04 77.74
पाटणा 83.31 78.61
चंडीगड 77.41 73.05
लखनऊ 80.98 73.63

आंतरराष्ट्रीय बाजारभाव स्थिर 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कायम आहे. मात्र, मंगळवारीच कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलपेक्षा एका डॉलरने वाढले आहेत. त्यावेळी दोन्ही इंधनाचे दर सलग चार दिवस स्थिर होते. मात्र, आज डिझेल १५ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यापूर्वी सोमवारीच दिल्लीत डिझेलच्या दरात १२ पैशांची वाढ झाली होती. मंगळवारीच कच्चे तेल चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. परंतु त्यानंतर, थोडा घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी बाराज बंद झाला त्यावेळी ०.२२ डॉलरची तेजी दिसून आली. 


दररोज ६ वाजता दर प्रसिद्ध


 दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.


आपण दर या प्रकारे तपासू शकता


तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील माहिती होऊ शकते. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी 9224992249 वर लिहून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी लिहून 9223112222 वर माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना एचपीप्राइसला लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.