मुंबई : पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतर आपल्यासाठी आधार बनते. तसेच बर्‍याच वेळा कर्मचारी आपल्या गरजेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढत असतात. जर तुम्हाला खेरोखरचं त्या पैशांची खूप गरज असेल तरचं तुम्ही ते पैसे काढा. पण जर तुम्हाला त्याची तशी जास्त गरज नसेल आणि तुम्ही पैसे काढलेत तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. खेरंतर सेवानिवृत्तीपूर्वी पैसे काढण्यामुळे तुम्ही 10 पट जास्त पैसे गमावू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे असे आम्ही का बोलत आहोत? याचे गणित काय आहे ते समजून घ्या


तुम्ही काढलेल्या पैशांपेक्षा 10 पट जास्त पैशांचं नुकसान तुमच्या सेवानिवृत्तीच्या फंडावर परिणाम करतात आणि यामुळे तुमचे बरेचं नुकसान होणार आहे. जर तुम्ही 1 लाख रुपये जमा केले असती तर, तुम्हाला त्यावर व्याज मिळत रहाणार आणि त्याची मुदत रक्कम 11.55 लाख रुपयांपर्यंत होईल.


त्यामुऴे अतिमहत्वाचे असल्याशिवाय तुमच्या ईपीएफमधून पैसे काढू नका. हे पैसे तुमच्या वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत जमा केली जाते आणि त्या वयाचे होईपर्यंत ही रक्कम बर्‍यापैकी वाढलेली असणार. सध्या पीएफ अकाउंटवर तुम्हाला 8.5 टक्के व्याज मिळत आहे. सर्व प्रकारच्या छोट्या बचत योजनांच्या तुलनेत हा सर्वाधिक व्याज आहे.


सेवानिवृत्तीसाठी 30 वर्षे असतील


जर तुमच्या सेवानिवृत्तीमध्ये 30 वर्षे असतील आणि तुम्ही 50 हजार रुपये काढले तर 5 लाख 27 हजार रुपयांचे तुम्हाला नुकसान होईल. त्याचबरोबर 1 लाख रुपयांवर 11 लाख 55 हजार रुपये, 2 लाख रुपयांवर 23 लाख 11 हजार रुपये, 3 लाख रुपयांवर 34 लाख 67 हजार रुपयांचे नुकसान तुम्हाला होईल.


सेवानिवृत्तीसाठी 20 वर्षे असतील


जर तुमच्या अंदाजानुसार निवृत्तीनंतर तुम्हाला 20 वर्षे असतील आणि तुम्ही 50 हजार रुपये काढले तर तुम्हाला 2 लाख 5 हजार रुपये गमवावे लागतील. त्याचप्रमाणे 1 लाख रुपयांवर 5 लाख 11 हजार रुपये, 2 लाख रुपयांवर 10 लाख 22 हजार रुपये, 3 लाख रुपयांवर 15 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान तुम्हाला होईल.त्यामुळे आता तुम्हीच विचार करा की, या पीएफ अकाउंटमधून पैसे काढायचे की नाही ते.