मुंबई : PF Withdraw : पगारदार व्यक्तीने अडचणीत असतानाच पीएफचे (PF) पैसे  (Money) काढावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. ईपीएफओने (EPFO) पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे (Online Money) काढण्याची सुविधा सुरु केल्यानंतर लोकांची मोठी सोय झाली आहे. आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला अचानक पैशाची गरज भासते. अशा वेळी, पीएफची रक्कम तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त आहे.


एक लाख रुपये काढण्याची सुविधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफ खातेधारकांना आता पैसे काढण्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात पीएफचे पैसे जमा होतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.


तासाभरात पैसे खात्यात जमा होणार


वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून ही सुविधा दिली जात आहे. या सुविधेत, जर एखाद्या कोरोना रुग्णाकडे उपचारासाठी पैसे नसतील तर तो उपचारासाठी पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो. या सुविधेत तासाभरात खात्यात पैसे येतील, असे सांगितले जात आहे.


अशा प्रकारे तुम्ही पीएफमधून आगाऊ पैसे काढू शकता


सर्वप्रथम www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होम पेजवर जा.
आता वरच्या उजव्या कोपर्‍यात दिलेल्या Online Advance Claim वर क्लिक करा.
https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर क्लिक करा
- येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला फॉर्म-31,19,10C आणि 10D दिसेल.
तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून पडताळणी करा.
यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
- ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31)
आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील, ते कारण निवडा.
 रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
 - नंतर तुमचा पत्ता त्या समाविष्ट करा
Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
तुमचा दावा दाखल झाला आहे. काही तासांत, तुमचे हक्काचे पैसे बँक खात्यात जमा केले जातील.


वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करा


कोविड-19 महामारीच्या युगात अनेकांना वैद्यकीय आपत्कालीन समस्येचा सामना करावा लागला. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे काही लोकांना वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता आला नाही. मात्र, पीएफमध्ये क्लेम केल्यानंतरही पैसे मिळण्यासाठी 3 ते 7 दिवस लागायचे. या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही तासांत पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे.