मुंबई : कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. आता डेल्टा व्हेरिएन्टने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.  अशात सांगण्यात येत आहे की, डेल्टा व्हेरिएन्टविरूद्ध लढण्यासाठी अमेरिकेची फायझर लस 90 टक्के प्रभावी आहे. फायझर लस भारतात मंजुरी मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. फायझर लस कोरोना विरूद्ध लढण्यात 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने केला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतात दुसऱ्या लाटेला जबाबदार डेल्टा व्हेरिएन्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेल्टा व्हिरिएन्टचा आता दुसरा म्यूटेशनने देखील एन्ट्री केली आहे. ज्याचं नाव डेल्टा प्लस आहे. भारत, यूके, अमेरिकासोबतचं अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे प्रत्येक व्हॅक्सिन कंपनी त्यांच्या लसीवर लक्ष केंद्रीत करत आहे. अशात फायझर व्हॅक्सिन भारतात येण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं सांगितलं जात आहे. डेल्टा व्हेरिएन्टवर मात फायझर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात लसीकरण मोहिमेचा एक भाग असलेल्या दोन लस म्हणजे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन देखीव डेल्डा व्हेरिएन्टविरूद्ध प्रभावी आहे. त्यामुळे कोरोनाला हारवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे.