नवी दिल्ली : सगळ्या पोलीस स्थानकांमध्ये आणि पोलीस कार्यालयांमध्ये यापुढे सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो लावणं बंधनकारक करण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयानं हे आदेश दिलेत. त्या फोटोबरोबरच भारताची एकता आणि अखंडता अखंडित ठेवू, असं ब्रीदवाक्यही लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 31 ऑक्टोबरला गुजरातमधल्या केवडियामध्ये राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरदार पटेल यांची 31 ऑक्टोबरला जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं जय्यत तयारी देखील केली आहे.


अनुच्छेद 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला देशाचा अभिन्न भाग बनवल्यामुळे गृह मंत्रालयाने स्टॅच्यू ऑफ युनिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.


गृह मंत्रालयाकडून एकता दिनाची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. या कार्यक्रमाला देशभरातील हजारो लोकं सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


देशात पहिल्यांदा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी नंतर एकता दिवसाचं आयोजन केलं जाणार आहे. कार्यक्रमा दरम्यान सरदार पटेल राष्ट्रीय एकता अवार्डचं देखील वितरण करण्यात येणार आहे.


मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्‍ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.


सरदार पटेल नॅशनल युनिटी पुरस्कार हा कमळाच्या पानांच्या आकाराचा असेल. पुरस्काराची लांबी 6 सेंटीमीटर, रुंदी 2 ते 6 सेमी पर्यंत असेल. चांदी आणि सोन्याचा वापर करुन हा पुरस्कार बनवला जाईल. या पुरस्कारावर सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असं लिहिलेलं असणार आहे.