नवी दिल्ली : दोन ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस देशभरात साजरा करण्यात आला. गांधी जयंतीचे औचित्य साधत सोशल मीडियातून अनेक संदेश, जोक्स व्हायरल झाले. या सर्वात एक फोटो मात्र जोरदार व्हायरल झाला. ज्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या फोटोत एका मुलीने चक्क दोन हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा कापून गांधींना वेगळे केल्याचे दिसते आहे. चर्चा आहे की, या मुलीला शाळेने गांधी जयंती निमित्त प्रोजेक्ट दिला होता. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या नादात या मुलीने चक्क भारतीय चलनातील सर्वाधीक किमतीच्या असलेल्या नोटाच कापल्या. दरम्यान, ही मुलगी नेमकी कोण आहे. तसेच, तिला प्रोजेक्ट देणारी शाळा आणि व्हायरल झालेल्या फोटोचे ठिकाणा समजू शकले नाही.


फोटोवरून देशभरात चर्चा सुरू आहे. काही लोकांचे म्हणणे असे की, हा खरा फोटो नसून फोटोशॉप केलेला आहे. तर, काहीचे म्हणने असे की, हा श्रीमंती दाखवण्याचा प्रकार आहे. कारण इतक्या छोट्या मुलीकडे कोणताही पालक इतक्या रकमेच्या चलनी नोटा देणार नाही. तर, दुसऱ्या बाजूला भारतीय चलन कापने हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यानुसार या मुलीच्या पालकांवर गुन्हा दाखल करावा असे काहींचे म्हणने आहे.




दरम्यान, हा फोटो अगदी बारकाईने पाहिल्यास ध्यानात येते की कापलेल्या सर्व नोटांवर एकच सीरियल नंबर दिसून येतो. याचाच अर्थ हा फोटो कुणीतरी फोटोशॉप केलेला असू शकतो.