भारावणारा क्षण! ज्या तान्हुल्याला मोठं केलं, त्यानंच आईसोबत घेतली गगनभरारी
हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन पायलट मुलाची विमानात एन्ट्री
Indigo Airlines Pilot Mother Son Video : आपल्या आईचा मदर्स डे (Mother's Day) स्पेशल व्हावा यासाठी प्रत्येक मुलाची धडपड असते. कोणी केक कापून कर काहींनी गिफ्ट देऊन आईच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला. मात्र एका इंडिगो एअरलाईन्सच्या पायलट मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून कुठल्याही आईला या पायलट मुलाचा अभिमान वाटेल.
इंडिगो एअरलाईन्सने आपल्या ऑफिशियल फेसबूक पेजवर पायलट मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आई आणि मुलाने पायलटचा युनिफॉर्म घातला आहे. पायलट मुलासोबत पहिल्यांदाच आईने विमानातून भरारी घेतली.
पायलट मुलाची विमानात सरप्राईज एन्ट्री -
पायलट मुलाने विमानात सरप्राईज एन्ट्री घेतली. हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन विमानात आला. हातातील पुष्पगुच्छ मुलाने आपल्या आईला दिला. विमानात मुलाला बघून आईच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. विशेष म्हणजे मुलाने अनाऊंसमेंट करताना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पायलट मुलाची स्टोरी ऐकल्यानंतर विमानातील प्रवशांना मोठा आनंद झाला. तर काही इमोशनलही झाले.
सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा -
व्हिडीओ शेअर करताना इंडिगो एअरलाईन्सने छान कॅप्शन दिलं आहे. मदर्स डेच्या दिवशी आई- मुलाची पायलटची जोडी, यापेक्षा आनंदाची काय गोष्ट असू शकते?. विमानात मुलगा पायटल आणि आई प्रवासी म्हणून प्रवास करत होती. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांसुद्धा हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.