नवी दिल्ली : बुराडी भागात संत नगर भागात एकाच घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूमागे एक पाईप कनेक्शन समोर आलं होतं. झी न्यूजचे पत्रकार जेव्हा घराची माहिती देत होते तेव्हा त्यांना घराच्या समोर एका भींतीतून 11 पाईप समोर आले. हे पाईप कसले आहेत याबाबत जेव्हा आजुबाजुच्या लोकांना विचारण्यात आलं तेव्हा कोणीही काहीही सांगू शकलं नाही. पोलिसांनी देखील यामागचं गूढ सापडू शकलेलं नाही. 


अंधश्रद्धेची कथा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भींतीत लावलेल्या या 11 पाईपला अंधश्रद्धेशी जोडलं जात आहे. एक पाइप भींतीच्या सर्वात वरती आहे जो घराचा मुख्य व्यक्ती आहे. बाकी 6 पाईप मोडलेले आहेत. जे घरांच्या महिलांकडे इशारा करत आहेत. चार पाईप सरळ आहेत जे घरातील पुरुष सदस्य आहेत. हे पाईप अंधश्रद्धेचा भाग आहेत का याची चर्चा सुरु झाली आहे.


मुलाचा आवाज परत आणण्यासाठी वाढली अंधश्रद्धा


आजुबाजुच्या लोकांचं म्हणणं आहे की, घरातील सर्वात छोट्या मुलाला गळ्याला दुखापत झाल्याने त्याचा आवाज गेला होता. यानंतर त्यांनी आसाराम यांना संपर्क केला. यानंतर काही दिवसांनी मुलाचा आवाज परत आला. तेव्हापासून या कुटुंबाचा आस्थेवर विश्वास बसला. पण लोकांचं म्हणणं आहे की याला धार्मिक अँगल नाही देता येणार. हत्या केल्यानंतर याला आत्महत्येचं अँगल दिलं जात असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.



नातेवाईकांचाही हत्येचा आरोप


प्रियंका यांचा मानलेला भाऊ प्रवीन मित्तल यांनी देखील मोक्ष मिळवण्यासाठी ही आत्महत्या नसल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी ललितचा एका अपघातात आवाज गेला होता. त्यानंतर एका रात्री एक बाबा उशीरा रात्री त्यांच्या घरी आले होते ज्यांनी पूजापाठ करण्यासाठी सांगितलं होतं. यानंतर के पूजापाठ करु लागले आणि त्याचा आवाज परत आला. संपूर्ण कुटुंब हनुमानची पूजा कराय़चा. मुळचे ते राजस्थानचे असल्याने ते बालाजीला देखील मानायचे.