लखनऊ : लखनऊमधील एका सीएचसीमधील काही विचित्र छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. मलिहाबाद CHC रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांच्या टेबलावर stethoscope ऐवजी पिस्तूल दिसले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊमधील मलिहाबाद हेल्थ कम्युनिटी सेंटरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डॉक्टरांच्या टेबलावर stethoscopeच्या जागी पिस्तूल ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये टेबलावर काळी पिस्तूल ठेवून उपचार सुरू असल्याचे दिसत आहे.


जितेंद्र वर्मा असे पिस्तूल ठेवणाऱ्या डॉक्टरचे नाव असून तो याआधीही अनेकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाची दखल घेत लखनऊचे सीएमओ मनोज अग्रवाल यांनी सांगितले की, आरोग्य विभागात बेशिस्तपणा खपवून घेतली जाणार नाही.


सीएमओ म्हणाले की, फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही बाब खरी असल्याचे लक्षात येताच डॉ जितेंद्र वर्मा यांना ताकीद देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची बदलीही करण्यात आली. डॉ जितेंद्र वर्मा यांची मलिहाबाद आरोग्य सुविधा केंद्रातून लखनऊमधील नगरम आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे.


याआधीही डॉक्टर जितेंद्र वादात सापडले आहेत. जितेंद्र वर्मा महिनाभरापूर्वी सीएचसी मलिहाबाद येथे रात्रीच्या ड्युटीवर होते. त्यानंतर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी रात्री उपचारासाठी सीएचसीला गेले. परंतू डॉक्टरांना मद्यधुंद अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. डॉक्टर जितेंद्र वर्मा रात्री ड्युटीवर असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप झाला होता. नशेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लखनऊचे सीएमओ मनोज अग्रवाल यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.