मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशाची अर्थव्यवस्था प्रथमच  जानेवारी ते मार्च २०१८ च्या तिमाहीत ७.७%टक्क्यांनी वाढली आहे . गेल्या अर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतली ही वाढ वर्षभरातल्या उरलेल्या तीन तिमाहीच्या तुलनेत सर्वाधिक होती.  त्याआधी एप्रिल ते जून २०१७ मध्ये विकासदर ५.६% होता.  तर पुढच्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर २०१७ मध्ये विकासाचा दर ६.३% और त्यापुढच्या ऑटोबर ते डिसेंबर २०१७मध्ये विकासाचा दर ७% होता. शेवटच्या तिमाहीत ७.७% विकासदर साधल्यामुळे वर्षभरात विकासदरात ६.७%ची वाढ नोंदवण्यात आली आहे.