नवी दिल्ली: सुरेश प्रभू यांनी अखेर रेल्वे मंत्रालयाला रामराम केला आहे. प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडलं आहे. सुरेश प्रभू यांच्या जागी आता मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतलेल्या पियूष गोयल यांना रेल्वे मंत्रालयाची नवी जबाबदारी देण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी प्रभू यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. आता प्रभू यांचं रेल्वे खातं काढून ते गोयल यांना देण्यात आलं आहे. प्रभूंना आता पर्यावरण खातं किंवा ऊर्जामंत्री पद मिळणार असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, प्रभूंनी ट्विट करुन रेल्वेच्या सर्व कर्मचा-यांचे आभार मानलेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतलेल्या सर्व सहका-यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.