नवी दिल्ली : सुरेश प्रभू यांच्याकडूने रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी येताच नवनिर्वाचीत रेल्वमंत्री पीयूष गोयल चांगलेच कामाला लागले आहेत. सूत्रे हाती येताच गोयल यांनी पहिला दणका रेल्वेप्रवासादरम्या प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या टीप आणि अतिरिक्त पैसे घेणऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रवासादरम्यान, टीप स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त पैसे घेण्याचा प्रकार येत्या ४८ तासात बंद करा, असे फर्मान गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सोडले आहे. जे कर्मचारी या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा सक्त इशाराही गोयल यानी दिला आहे.


दरम्यान, रेल्वेमंत्री आणि रेल्वेमंत्रालयाकडून आलेल्या आदेशानंतर IRCTC ही खडबडून जागे झाले आहे. त्यांनी आपल्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर्सना तशा सूचना दिल्या असून, आदेशांचे पालन करण्यास सांगितले आहे. जे कर्मचारी रेल्वेमंत्रालयाच्या या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. येत्या सोमवारपासून, रेल्वे कॅटरींग इन्स्पेक्टर्स रेल्वेत प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जाऊ नयेत म्हणून बारीक लक्ष ठेऊन असतील.