नवी दिल्ली : कोरोना महामारीमध्ये आर्थिक संकटाचा सामना करीत करताना , PF Account फंड मधून पैसे काढण्याचा विचार करीत असाल. तर त्यासंबधीच्या नियमांनादेखील समजून घ्या. नियमांच्या पूर्ण माहितीशिवाय तुम्ही गोंधळात पडू  शकता. गेल्या वर्षी नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारने परवानगी दिली होती, की आगाऊ PFची रक्कम काढता येईल. सरकारतर्फे हे सांगण्यात आले आहे की, कर्मचारी भविष्य निधीतर्फे सदस्य आपल्या रक्कमेतून 75 टक्के किंवा तीन महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता इतकी रक्कम काढता येऊ शकते. यापैकी जी रक्कम कमी असेन ती काढण्याची परवानगी असेल.


  याबाबतीत टॅक्स लागत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदा. एखाद्या व्यक्तीच्या पीएफ अकाऊंटमध्ये 1 लाख रुपये आहेत. त्याची तीन महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता 45 हजार रुपये आहे. तर नियमानुसार 45 हजार रुपये काढण्याची परवानगी असेल. वि़ड्रॉ क्लेम केल्यानंतर 3 दिवसात याची प्रक्रीया सुरू होते. कोव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे सरकारने या पैशाला टॅक्स फ्री केले आहे.


तज्ज्ञांचे मत


 कोणत्याही कर्माचऱ्याने नोकरी बदलताना PF एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केला तर, त्याला टॅक्स लागत नाही. आर्थिक चणचण असेल तर, PFच्या पैशांचा वापर केला जातो. परंतु निवृत्तीच्या आधी शक्यतो पीएफमधील पैसे काढू नये. सुरूवातीच्या दिवसांमध्ये पीएफचे पैसे काढण्याचा अर्थ आहे. की, संबधिताला व्याजाचा फायदा कमी होऊ शकतो.