पोपट पिटेकर,झी मीडिया, मुंबई : पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत वर्षाला लाखो रुपये कमवायचे असेल तर तुमच्यासाठी पपई शेती (Papaya farming) हा उत्तम पर्याय आहे. शेतात एकदा पपईची लागवड केल्यांनतर 3-4 वर्षे फळे मिळतात. फळझाडांची पडझड झाली तरी वार्षिक उत्पादन हे 10 लाख पर्यंत (Annual production is 10 lakhs) तुम्ही सहज कमवू शकता.


देशात विविध ठिकाणी लागवड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पपईची लागवड (Cultivation of papaya) देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आसाम, उत्तरांचल आणि मिझोराम या राज्यांमध्ये पपईची लागवड (Cultivation in the country) मोठ्या प्रमाणावर केली जाते.  त्याची लागवड वर्षातून 12 महिने सतत करता येते.


लागवडीसाठी योग्य महिना


पपईची लागवड तुम्ही वर्षाचे बाराही महिने करु शकता. मात्र, फेब्रुवारी, मार्च आणि ऑक्टोबर हे महिने यासाठी सर्वात योग्य मानले जातात. या महिन्यांत वातावरण फारशे थंड किंवा उष्णही (Cold or hot)नसते. अशा स्थितीत पपई पिकांना दव किंवा उष्माघाताचा धोका कमी असतो. त्यामुळे या महिन्यात पपई लागवड करणं उत्तम (It is best to plant papaya) मानलं जातं.


रोपे असे करा तयार


पपईची लागवड सुरू करण्यापूर्वी रोपवाटिकेत त्याचे रोप (plant in the nursery) तयार केले जाते. 500 ग्रॅम बियाण्यांसह, आपण रोपवाटिकेत एक हेक्टरचे एक रोप तयार करू शकतो. झाडाची लागवड करण्यापूर्वी शेत चांगले तयार करून सपाटीकरण करावे. त्यानंतर रोपवाटिकेत तयार झालेली रोपे खड्ड्यांमध्ये लावावीत. खड्ड्यात रोपे लावताना माती आणि शेण (soil and dung) टाका जेणेकरून झाडे लवकर वाढू शकतील. खड्डा भरल्यानंतर पाणी द्यावे, जेणेकरून माती चांगली बसेल.


पपई लागवडीसाठी माती


पपई लागवडीसाठी 6.5-7.5 pH मूल्य असलेली हलकी चिकणमाती (Light clay) लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. या मातीच्या मदतीने तुम्ही मटार, मेथी, हरभरा, फ्रेंच बीन्स आणि सोयाबीन इत्यादी कडधान्य पिके (pulse crops)सह-पिके म्हणून घेऊ शकता.


पपई कधी कट करावे


पपई पूर्ण पिकल्यावर आणि मध्यभागी पिवळसर दिसू लागल्यावर देठासह पपई (Cut papaya)उपटून घ्यावी. पपई वेगवेगळ्या आकाराचे असल्याने त्याचं वर्गीकरण करावे. तसेच खराब झालेले फळे काढून टाकावीत.


येवढा होणार नफा


शेतकरी मित्रांनो एका पपईच्या झाडावर 30 ते 40 किलो फळे येतात. जर तुम्ही एका हेक्टरमध्ये 2 हजार 250 रोपे लावली तर ते झाडात वाढल्यानंतर सुमारे 900 क्विंटल फळे देऊ शकतात. बाजारात एक किलो पपईचा भाव किमान 40 ते 50 रुपयांपर्यंत गेला तर शेतकऱ्याला 8 ते 10 लाखांचा नफा सहज मिळवता येऊ शकतो.