मुंबई : जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आता या खास योजनेअंतर्गत घर बनवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच तिप्पट रक्कम मिळणार आहे. समितीने म्हटले की, आता घरे बांधनीचा खर्च वाढला आहे. जर प्रस्तावाला संमती मिळाली तर, लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आधीपेक्षा तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत. जाणून घेऊ या काय आहे हा प्रस्ताव?


पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंड विधानसभा प्राक्कलन समितीने राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बनवण्यासाठी चार लाख रुपये देण्याची मागणी केली होती. समितीचे सभापती दिपक बिरूआने मानसून सत्राच्या शेवटच्या दिवशी प्राकल्लन समितीचे प्रतिवेदन सभा पटलावर ठेवले होते. झामुमोचे आमदार दीपक बिरुआचे म्हणणे होते की, प्रत्येक वस्तुची किंमत वाढली आहे. सध्या वाळू, सिमेंट, छड, विटा, खडीच्य महागाईमुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या घरांसाठी जास्त खर्च लागत आहे.


केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना आग्रह


बिरुआने म्हटले की, बीपीएल कुटूंबिय आपल्याकडून 50 हजार ते एक लाख रुपये खर्च करू शकत नाही. अशातच केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तयार होत असलेल्या घरांसाठी 1.20 लाख रुपयांनी वाढवून 4 लाख रुपये केली जावी.