PM Jan Dhan Yojana Benefits: आपल्याला आपले पैसे (Money) सुरक्षित ठेवण्यासाठी बॅंक खाते (Bank Account) उघडावे लागते. आपण बॅंक खाते उघडले की आपल्याला आपल्या सेव्हिंग्स अकांऊटमधून (Savings Account) हवे तेव्हा पैसे काढता येतात आणि ते वापरता येतात. परंतु तुम्हाला माहितीये का की असेही एक खाते आहे ज्यातून तुमचे पैसे त्या बॅंकेत शिल्लक नसले तरी आपण त्यातून 10 हजारापर्यंतची रक्कम काढू शकतो. ही योजना आहे प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojana). या योजनेचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे. या अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये खातेदारांना अनेक सुविधा मिळतात. या खात्याअंतर्गत तुमच्या खात्यात शिल्लक (Saving Account) नसली तरीही तुम्ही 10,000 रुपये काढू शकता. याशिवाय रुपे डेबिट कार्डची सुविधा दिली आहे ज्याद्वारे तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता. ही योजना 2014 मध्ये सुरू झाली होती आणि 2018 मध्ये या योजनेत काही फेरबदल केले होते आणि या योजनेची दुसरी आवृत्ती आणली होती. या योजनेअंतर्गत तुम्हाला चांगल्या सुविधाही मिळू शकतात. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


काय आहेत सुविधा ? 


  • जन धन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे खातेही उघडता येते. 

  • या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड (ATM Card), 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30,000 रुपयांचे जीवन संरक्षण आणि जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते. 

  • यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची (Overdarft) सुविधाही मिळते.

  • हे खाते कोणत्याही बँकेत (Bank) उघडता येते.

  • यामध्ये तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


  • जन धन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात. तुम्ही जन धन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्ससह KYC ची आवश्यकता पूर्ण करणारी कागदपत्रे देखील सबमिट करू शकता. तुमच्याकडे कागदपत्रे नसल्यास, तुम्ही छोटे खाते उघडू शकता. 

  • यामध्ये तुम्हाला बँक अधिकाऱ्यासमोर स्वत:चे साक्षांकित छायाचित्र आणि तुमची स्वाक्षरी भरावी लागेल. जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा शुल्क द्यावे लागणार नाही.