जयेश जुगाड, झी मीडिया, अकोला: आजकाल सापाचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातून महाराष्ट्रातही (Snakes in Maharashtra) असे अनेक व्हिडीओ तयार केले जातात आणि व्हायरल होतात. सोशल मीडियावर अशा व्हिडीओजना खूप पसंती मिळते. सर्पमित्र अनेकदा एकत्र जमतात आणि सामान्यांसाठी सापांबद्दल कायमच चांगली माहिती देत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला परत माणूस आणि प्राण्याच्या (Maharashtra News) नात्याबद्दल पुन्हा एकदा विश्वास बसेल. कारण एका महिलेनं सरळ एका सापाचा जीव वाचावला आहे. (a women saves a cobra snake risking her own life viral news)
मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!
अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur in Akola) तालुक्यातील पळशी येथे एका महिला सर्पमैत्रिनने कोब्रा सापाला जीवदान दिलेय..बाळापूर तालुक्यातील पळशी येथे एका घराचा अंगणात कोब्रा जातीचा विषारी साप आढळून आला सदर घटनेची माहिती पारस येथील वन्यजीव संस्थाच्या महिला सर्पमैत्रिन प्रतिभा ठाकरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून शिताफीने विषारी अशा कोब्रा सापाला पकडून गावकऱ्यांना भयमुक्त केले, या पूर्वी सुद्धा महिला सर्पमैत्रिन प्रतिभा ठाकरे (Pratibha Thackeray) यांनी अनेक सापांना पकडून त्यांचे प्राण वाचावीत अनेक नागरिकांना भयमुक्त केले आहेय..यानंतर पकडलेल्या या नागाला जंगलात सोडण्यात आलं...
सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यासोबतच या महिलेचं सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा कोब्रा एका खुप खोल दगडाच्या भागात लपलेला होता. पहिल्यांदा नागरिकांना या प्राण्याबद्दल नीट कळलं नाही, परंतु नंतर मात्र लोकांच्या लक्षात आले की येथे एक मोठा साप (Viral Snake Video) लपलेला नसून तो अकडलेला आहे. त्यामुळे तातडीने सर्पमित्र असणाऱ्या एका महिलेनं स्वतःहून पुढे होत सापचे प्राण वाचविले आहेत. ही गोष्ट पाहून सगळ्यांनी त्या महिलेचं कौतुक केले आहे.