नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म 'किसान सारथी' ला लॉंच केले आहे. या प्लॅटफॉर्मवरून शेतकऱ्यांना पिक तसेच अन्य गोष्टींची माहिती देण्यात येणार आहे. सोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून धान्य तसेच भाज्यांची विक्रीसुद्धा करता येणार आहे.Kisan Sarathi Digital Platform Launched


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे किसान सारथी?
भारताचे IT मंत्री अश्विनी वैष्णव आणि कृषी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 'किसान सारथी'(Kisan Sarathi) लॉंच केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमांतून त्यांनी लोकांना किसान सारथीबाबत लोकांना माहिती दिली आहे. आयसीएआरच्या 93 व्या स्थापना दिवसानिमित्त किसान सारथीला लॉंच करण्यात आले आहे.


किसान सारथीचा फायदा
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला योग्य भाव मिळावा यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital platform) माहिती मिळणार आहे. शेतकऱ्याल डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून पिकांशी संबधित  माहिती थेट वैज्ञानिकांकडून प्राप्त होणार आहे. सोबतच शेतीच्या आधुनिक पद्धतींची देखील माहिती होईल.


शेतकऱ्यांवर योजनांचा पाऊस
कृषी कल्याण मंत्रालय, मत्स पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाला मजबूत करण्यासाठी अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)यांनी म्हटले की, अनेक मंत्रालय एकत्र येऊन सरकारला मदत करीत आहेत. किसान सारथीतून मिळणाऱ्या माहितीतून शेतकरी आणि व्यापारी सहजरित्या शेतमालाची खरेदी आणि विक्री करू शकतील.