COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment |  कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) 11व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत. योजनेच्या 12 कोटी 50 लाख लाभार्थ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यातच हप्ता येणे अपेक्षित आहे.


लाभार्थ्यांच्या खात्यावर 11 वा हप्ता लवकरच येईल अशी अपेक्षा आहे.  राज्‍य सरकारांनी पात्र शेतकऱ्यांच्‍या रिक्वेस्ट फॉर ट्रान्स्फर (RFT) वर स्वाक्षरी केली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 3 मे रोजी पंतप्रधान मोदी स्वतः हा हप्ता जारी करतील अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या वर्षी देखील 15 मे रोजी हप्ता जारी करण्यात आला होता.


11 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी आवश्यक


पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीखही सरकारने 31 मे पर्यंत वाढवली आहे. 


या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये पाठवण्यात येतात. ही रक्कम 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. यामध्ये सुमारे 12.5 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.