मोदी सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, येत्या 17 ऑक्टोबरला...
मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता शेतकर्यांची दिवाळी देखील गोड होईल. PM Modi 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता...
PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दिवाळीपूर्वी, पंतप्रधान मोदी (PM narendra modi) या आठवड्यात देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करू शकतात. 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करतील, असं सांगण्यात आलं आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान मोदी 17 ऑक्टोबर रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीच्या फेअर ग्राउंड येथे 'पीएम किसान संमेलन 2022' ला (12th Installment Latest Update) संबोधित करतील. त्यावेळी पंतप्रधान मोदी ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
पैसे ट्रान्सफरला विलंब का?
दरम्यान, या योजनेतील (PM Kisan Samman Nidhi Scheme) अनियमितता टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी e-KYC अनिवार्य केलंय. e-KYC Update करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण झाले नसल्यानं मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे.
आणखी वाचा - Aadhaar: तुम्ही अजून मुलांचे आधार कार्ड बनवले नाही, मग जाणून घ्या त्याचे महत्त्व
अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप e-KYC केलं नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही e-KYC पूर्ण करू शकता. https://pmkisan.gov.in/ वर जाऊन तुम्ही तुमची e-KYC Update करू शकता. यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी (Check your name in pm kisan) तुमच्यासमोर येईल. तिथं तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.