शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana: राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर करत आहेत. आता केंद्र सरकारने PM किसान निधी योजनेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2024 च्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ 12 योजना येणार आहेत. तसे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. पीएम किसान निधी या योजनेमधून प्रत्येकवर्षी 6 हजार रुपये शासनाकडून बळीराज्याला दिले जात असतात. आता ही रक्कम दुप्पट म्हणजे 12 हजार रुपये करण्याच येण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
आणखी अशा काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशात शेती सुधारण्यासाठी जमिनीची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी केंद्र सरकार, आध्यात्मिक गुरुंची मदत घत आहे. श्रीश्री रविशंकर आणि संत सद्गगुरुंचा सल्ला आणि मार्गदर्शानाखाली केंद्र सरकार रासायनिक उर्वरकांचा शेतीतील वापर बंद करणार आहे. आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याची योजना तयार करत आहे.
तसेच 2024 च्या निवडणुकीसाठी देशातील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेसाठी 370000 कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस खरीप आणि रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढविण्याचीही योजना तयार आहे.
केंद्रीयमत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 12 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. 630000 कोटी रुपये किसान सन्मान निधी, खत सबसिडी, एमएसपीमध्ये वाढ, सिंचन प्रकल्पासाठीचा निधी व अन्य मदत याद्वारे देण्यात येत आहे. 12 कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम दिल्यास प्रत्येक शेतकऱ्याला 52 हजार रुपयांपेक्षा जास्त होतात.
PM किसान योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून याचा सगळा खर्च केंद्र सरकार करत असते. डिसेंबर 2018 साली केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती. 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दर वर्षाला प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्ते या योजने अंतर्गत देण्यात येत होते. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
PM किसान या योजनेत आपले नाव पाहू शकता, कसे ते पाहा?
1- PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
2- त्यानंतर होम पेजवरती आपल्याला उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन दिसेल.
3- Farmers corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवरती जावे लागेल .
4- नंतर आपल्याला आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडावा लागेल .
5. नंतर लाभार्थ्यांची संम्पूर्ण यादी समोर येईल त्यामध्ये आपल्याला आपले नाव पाहवे लागेल.