PM Kisan | या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हफ्ता; यादीत चेक करा तुमचे नाव
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे.
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे. तारीख निश्चित झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे.(PM Kisan 10th installment)
केंद्र सरकारकडून तारीख निश्चित
सरकारने आतापर्यंत 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. आता केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना (PM KISAN scheme)चा पुढील म्हणजेच 10 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर पाठवणार आहे.
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 9 वा हफ्ता जमा झाला नव्हता त्यांना आता पुढील हफ्त्यावेळी एकूण 4000 ची रक्कम प्राप्त होणार आहे. परंतु ही सुविधा त्या शेतकऱ्यांना मिळू शकेल ज्यांनी 30 सप्टेंबर आधी नोंदणी केली असेल.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 10 वा हफ्ता येत्या काही दिवसात जमा करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये तीन हफ्त्यांमध्ये जमा करण्यात येतात.