PM Kisan Yojana: किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी, `या` शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
Trending News : भारतातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
PM Kisan Samman Nidhi : भारतातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी (Farmers Big News). पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi ) 12 व्या हप्त्याचे पैसे जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील (New Delhi) पीएम किसान सन्मान संमेलनादरम्यान 12 वा हप्ता जारी केला. या कार्यक्रमात मनसुख मांडविया, नरेंद्रसिंग तोमर उपस्थित होते. दिवाळी तोंडावर आल्यामुळे शेतकरी 12व्या हप्त्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आज अखेर संपली. मोदी सरकार देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. (pm kisan yojana 12 installment Trending News nmp)
या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
1. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झाले नाहीत ते 12व्या हप्त्याच्या लाभापासून ते वंचित राहू शकतात. भारत सरकारने ई-केवायसीसाठी 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र अजूनही पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून केलं नाही त्यांनी त्वरीत ई-केवायसी करुन घ्या.
2. जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. त्या आपत्कालीन शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचा लाभही मिळणार नाही.
3. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अर्ज करताना चुकीची माहिती टाकली होती, त्यांनाही याचा लाभ घेता येणार नाही.