PM Kisan Yojana Date : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने देशात पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. 2 हजार रुपयांच्या तीन टप्प्यात ही रक्कम दिली जाते. आता देशातील कोट्यवधी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या 10व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी शेतकऱ्यांना 15 डिसेंबरला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये दिले जातील अशी माहिती देण्यात आली होती. पण 15 डिसेंबरची तारीख निघून गेल्यानंतरही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. आता नव्या तारखेबद्दल शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार येत्या 25 डिसेंबरला पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल, असं बोललं जात आहे.


पीएम किसान योजनेची नवी तारीख 
पीएम किसान योजनेचा दहावा हफ्ता 25 डिसेंबरला शेतकऱ्यांना मिळू शकतो. या तारखेची शक्यता यासाठी वर्तवण्यात आली आहे कारण गेल्या वर्षी 25 डिसेंबरलाच केंद्र सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. त्यामुळे यावर्षीही 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. 


तरच मिळेल रक्कम
पीएम किसान योजनेतंर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ई-केवाईसी (KYC) अनिवार्य केलं आहे. शेतकऱ्याने ई-केवाईसी केलेलं नसेल तर त्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेच्या पैशापासून वंचित राहावं लागेल. 


शेतकऱ्यांना मिळालेत आतापर्यंत 9 हफ्ते
पीएम किसान सम्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत 9 हफ्ते दिले आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 


प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहत केंद्र सरकार की ओर से किसानों को अब तक नौ किस्तें भेजी जा चुकी हैं. हर बार सरकार दो-दो हजार रुपये की किस्त भेजती है. यावेळी दहाव्या हप्त्यासोबतच नवव्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही दोन हफ्त्याची रक्कम मिळेल. त्यामुळे या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.