PM Kisan Yojana: आजकाल शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत.  हे लक्षात घेऊन सरकारने पीएम किसान सन्मान निधी वाटप करताना महत्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आता फेस आयडी, ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने PM-Kisan Mobile App नावाचे खास  App  लाँच केले आहे. 


या  App मध्ये ऑथेंटिकेशन फीचर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ओटीपी किंवा फिंगरप्रिंटची गरज नाही. हे  App  शेतकऱ्याच्या चेहऱ्याची पडताळणी करून स्कॅन करेल.  ई-केवायसी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला योजनेची रक्कम मिळेल.


मोबाईल नंबर आधारशी लिंक नसलेल्या वृद्ध शेतकऱ्यांना या App सुविधेचा अधिक फायदा होणार आहे. हे  App लॉन्च करताना कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, कृषी सचिव मनोज आहुजा, याशिवाय सचिव प्रमोद कुमार मेहेरदा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


PM-Kisan मोबाईल App मधील फेस ऑथेंटिकेशन फीचरची पायलट चाचणी 21 मे रोजी सुरू झाली. या  App द्वारे आतापर्यंत सुमारे 3 लाख शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती प्रमोद मेहराडा यांनी दिली. 


शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक्सची मदत घ्यावी लागली. परंतु या  App द्वारे शेतकरी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करू शकतात आणि इतर शेतकऱ्यांनाही मदत करू शकतात. यामुळे कोणतीही फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्यांचा सर्व डेटा सरकारकडे उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. 


याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून हे App डाउनलोड करावे लागेल. यानंतर शेतकऱ्यांना घरी बसून त्यांची E-KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.  तसेच सरकारकडून येणाऱ्या योजनांची माहितीदेखील यामाध्यमातून मिळणार आहे.